आशय घन निवृत्ती
आशय घन निवृत्ती लेखक प्रसाद नातू प्रकाशन भाग्यश्री प्रकाशन ISBN 978-81-687601-4-1 प्रथम आवृत्ती 28 जून 2026 मुखपृष्ठ गौरी सोनार मूल्य 180 रुपये पृष्ठ संख्या 104 संक्षिप्त परिचय प्रसाद नातू लिखित पुस्तक निवृत्ती नंतरचा काळ सदुपयोग करत कसा घालवावा याच्याबद्दल भाष्य करते.स्वतःच्या अनुभव शिदोरीतून सर्व कंगोरे स्पर्श करते. निवृत्तीनंतर अथांग मोकळा वेळ असतो.त्याचा सुयोग्य वापर कसा करावा याचा एक सजग आराखडा हे पुस्तक देते.तसेच एक आपला सखा आपल्याला निवृत्तीनंतरच्या वेळेचे नियोजन करण्यात येणारे टप्पे, प्रत्येक टप्प्यामध्ये काय काळजी घ्यावी ह्याची अतिशय सविस्तर माहिती देतो. सविस्तर परिचय पुस्तकात 15 अध्याय आहेत.सेवानिवृत्तीनंतर पुनर्जन्म कधी आणि कसा होतो, हरवलेली ओळख कशी शोधायची, स्वतःमध्ये काय मानसिक ,भावनिक आणि शारीरिक बदल अपेक्षित आहेत, त्यांना कसे सामोरे जायचे याच्यावरती अतिशय सोप्या शब्दात लिखाण आहे. मेंदू वृद्ध न होता शरीराची पुनर्बांधणी करू शकतो.त्याला योग्य मार्ग आणि शिस्त हवी.सर्वाची पुनर्रचना करत एक आनंदी निवृत्त आयुष्य आपण कसे जगू शकतो याच्यावर हे पुस्तक आपल्याला सविस्तर आणि ...