Posts

हेड हंटर -असे शोधले जातात कॉर्पोरेट जगातले डिसिजन मेकर्स (गिरीश टिळक)

हेड हंटर -असे शोधले जातात कॉर्पोरेट जगातले डिसिजन मेकर्स (गिरीश टिळक) लेखक सुमेध वडावाला रिसबुड राजहंस प्रकाशन आवृत्ती पहिली जुलै 2010 आवृत्ती पाचवी ऑक्टोबर 2021 मुल्य 225/- पृष्ठसंख्या 201 सारांश परिचय हेड हंटर गिरीश टिळक ह्या प्रसिद्ध व्यक्ती चा कॉर्पोरेट जगातील यशस्वी प्रवास आपल्यासमोर हे पुस्तक मांडते.प्लेसमेंट कन्सल्टंट म्हणून ते सुप्रसिद्ध आहेत. कोणत्याही कंपनीत 90 टक्के माणसं हे आपल्या शरीराच्या अन्य सामान्य अवयवांसारखे असतात. परंतु दुर्दैवाने दोन्ही पाय तुटले तरी माणूस जिवंत राहू शकतो;परंतु मेंदू, यकृत, हृदय असे काही अवयव आहेत जे काम करेना झाले तर देहाच्या अस्तित्वाचा प्रश्न उभा राहतो. कंपनीतली दहा ते पंधरा टक्के माणसं ही अशीच महत्वाची असतात आणि ती अचानक कंपनी सोडून गेली तर त्याचं काम दुसरा कोणी तातडीने करू शकतो असा व्यक्ती शोधणे गरजेचे असतं. अशा या व्यक्ती हुडकून काढून कंपनीत त्या रुजू होईपर्यंतचा घटनाक्रम पूर्ण करून देणे म्हणजे हेड हंटिंग. हा उद्योग भारतात विकास अवस्थेत असला तरी युरोपिय देशात तो उत्तम बाळस धरून आहे.कंपन्यांच्या मानव संसाधन खात्यांना जमू ...

जंगल विद्या ट्री टॉप्स

जंगल विद्या ट्री टॉप्स लेखक जिम कॉर्बेट संपादक आणि अनुवादक डॉक्टर कमलेश सोमण गोयल प्रकाशन प्रथम आवृत्ती 4 september 2022 मुल्य 225/- पृष्ठसंख्या 200 संक्षिप्त परिचय जिम कॉर्बेट हे एक महान निसर्ग रक्षक होते. जिम यांनी जंगली प्राण्यांच्या जीवन क्रमाचा सखोल अभ्यास तर केलाच पण असंख्य फोटोग्राफ्स काढले.अनेक पुस्तकाद्वारे शहरी माणसाला वन्य जीवन आणि निसर्गाबद्दल सज्ञान केले. त्यांनी निसर्गाकडे पाहण्याची दृष्टी बदलून टाकत माणसाला निसर्गाच्या अधिकाधिक जवळ नेले.गडवाल कुमाऊ ह्या नैनितालच्या निसर्गरम्य परिसरात कॉर्बेट यांचे बालपण आणि शिक्षण झालं. त्या काळातच काला ढोंगी गावाजवळ जंगल प्रदेशात शिकारीचा आणि निसर्ग वाचन करण्याचे शिक्षण मिळाले. मूळचे शिकारी असलेल्या जिम कॉर्बेट यांना प्रकर्षाने जाणवलं की जंगलातील नैसर्गिक वाघ आणि इतर मोठ्या वन्यजीवांची संख्या कमी होत चालली आहे.म्हणून त्यांनी बंदुकी ऐवजी कॅमेरा वापरून वन्यजीवन टिपले. फक्त नरभक्षक झालेले वाघ आणि बिबटे यांची शिकार त्यांनी केली.1907 ते 1968 या काळात सुमारे पंधराशे लोकांना मारणाऱ्या 19 नरभक्षक वाघ आणि 14 नरभक्षक बिबट्यांची शि...

प्राचीन भारतीय खगोल विज्ञान

प्राचीन भारतीय खगोल विज्ञान लेखक: निलेश निळकंठ ओक, रूपा भाटी,लीना दामले प्रकाशक: सकाळ प्रकाशन प्रथम आवृत्ती:डिसेंबर 2024 ISBN 978 -93 -480 48- 25-7 पृष्ठसंख्या 141 मूल्य 200/- हे एक वेगळ्या धाटणीचे पुस्तक आहे.निलेश नीलकंठ ओक आणि रूपा भाटी यांच्या प्रसिद्ध पॉडकास्ट मुलाखतीनंतर आपले भारतीय खगोलशास्त्र अधिक खोल वाचावेसे वाटले. पुस्तकाचे तीन प्रमुख भाग आहेत. 1. भारतीय ज्ञान संस्कृतीचे प्राचीनत्व 2. प्राचीन भारतीय खगोल विज्ञान :निरीक्षण,पुरावे,निष्कर्ष 3.मध्ययुगीन कालखंडातील ज्ञान परंपरा 4.संदर्भ ग्रंथ सूची हे पुस्तक मुळात सुर्य सिद्धांत या अतिशय प्रसिद्ध खगोलशास्त्रावरील ग्रंथाचा प्रमाण मानत लिहिलेले आहे.तसेच इंडोलॉजी या विषयातील विद्यार्थ्यांना देखील अतिशय महत्त्वाचे पुस्तक आहे.यात वैज्ञानिक आणि शैक्षणिक निष्कर्ष,त्याच्याबद्दल असलेले तर्क,पुरावे,अज्ञान यावरती मुख्यत्वे प्रकाश टाकण्याचे काम करते. इतिहासाला पुराणाची जोड देत पुराव्यासकट गोष्टी सादर करण्यामध्ये हे पुस्तक एक महत्त्वाची भूमिका बजावते. दुर्दैवाने आपला इतिहास,भूगोल हा मोठ्या प्रमाणामध्ये परकीय लोकांनी पेरलेल्या गो...

द मोटरसायकल डायरीज

द मोटरसायकल डायरीज लेखक अर्नेस्टो चे गवेरा अनुवाद अमृता देशपांडे मधुश्री पब्लिकेशन मराठी प्रथम आवृत्ती ऑगस्ट 2022 दुसरी आवृत्ती ऑक्टोबर 2023 ISBN 9788195377251 मुल्य 300/- पृष्ठ संख्या 257/- अर्नेस्टो चे गवेरा म्हणजेच चे हा एक अतिशय प्रसिद्ध क्रांतिकारी आणि जगभरात नावाजलेले व्यक्तिमत्व. जेवढे प्रेमळ तेवढेच वादग्रस्त.परंतु याचे एक वेगळे रूप आपल्याला द मोटरसायकल डायरीज या पुस्तकातून बघायला मिळते. मोटरसायकल डायरी यावर अनेक चित्रपट आणि अनुवाद देखील झाले आहेत.मराठी अनुवाद अमृता देशपांडे यांनी केला आहे. चे आणि माझी ओळख स्पॅनिश भाषा शिकताना झाली. आणि ह्या पुस्तकात गट्टी झाली. तसं पाहिलं तर चे हा सगळ्यांना क्युबन क्रांती द्वारे माहिती आहे.परंतु एका क्रांतिकारी होण्याआधी तो एक साधासा मेडिकल ग्रॅज्युएट होता. 23 व्या वर्षी (1951 -52) आपला मित्र Alberto ग्रॅनाडो( एक बायोकेमिस्ट) सोबत त्याने जवळपास संपूर्ण दक्षिण अमेरिका खंड आपल्या मोटरसायकलवर पालथा घातला. त्यांची मोटरसायकल जेव्हा खराब होते तेव्हा वेगवेगळ्या ठिकाणाहून लिफ्ट घेत,मिळेल त्या ट्रकमध्ये,ॲमेझॉन नदीमध्ये तराफ्यातनं त्यांनी अ...

《 श्री गणेश 》 आशियाचे आराध्य दैवत

《 श्री गणेश 》 आशियाचे आराध्य दैवत लेखक:डॉक्टर मधुकर केशव ढवळीकर राजहंस प्रकाशन प्रकाशक:दिलीप माजगावकर पुणे पहिली आवृत्ती ऑगस्ट 2009 दुसरी आवृत्ती एप्रिल 2013 छापील किंमत 175 रुपये आयएसबीएन 9781 7434 4687 सगळ्या विद्या आणि कलांचा अधिपती, शिवपार्वतीचा पुत्र आणि कार्तिकेय चा भाऊ ,विघ्नहर्ता, आपला गणपती बाप्पा साऱ्यांचाच लाडका आहे. आपल्या महाराष्ट्रात तो अतिशय जवळचा सखा आहे. गणेशोत्सव आपण साजरा करतो.गणेश स्तोत्र रोज म्हणतो. हाच गणेश आशियाचा देखील आराध्य दैवत आहे. हे अतिशय वेगळ्या पद्धतीचे पुस्तक आहे. गणपती किंवा गणेश याचा उगम कसा झाला ह्या विषयाचा नाणेशास्त्र ,मुर्तीशास्त्र ,इतिहास,पुराण,शिल्पकला किंवा शिल्प (सध्या उत्खननामध्ये उपलब्ध) जे जपून ठेवले आहेत यांचे संदर्भ देत आपल्याला गणपती या देवतेचे विविध कालखंडातील स्वरूप, त्याच्या जन्माच्या आख्यायिका, काही परकीय इतिहासकारांनी लिहिलेले वादग्रस्त टिप्पण्या व इतर गोष्टी याबद्दल आपल्...