हेड हंटर -असे शोधले जातात कॉर्पोरेट जगातले डिसिजन मेकर्स (गिरीश टिळक)
हेड हंटर -असे शोधले जातात कॉर्पोरेट जगातले डिसिजन मेकर्स (गिरीश टिळक)
लेखक सुमेध वडावाला रिसबुड
राजहंस प्रकाशन
आवृत्ती पहिली जुलै 2010
आवृत्ती पाचवी ऑक्टोबर 2021
मुल्य 225/-
पृष्ठसंख्या 201
सारांश परिचय
हेड हंटर गिरीश टिळक ह्या प्रसिद्ध व्यक्ती चा कॉर्पोरेट जगातील यशस्वी प्रवास आपल्यासमोर हे पुस्तक मांडते.प्लेसमेंट कन्सल्टंट म्हणून ते सुप्रसिद्ध आहेत.
कोणत्याही कंपनीत 90 टक्के माणसं हे आपल्या शरीराच्या अन्य सामान्य अवयवांसारखे असतात. परंतु दुर्दैवाने दोन्ही पाय तुटले तरी माणूस जिवंत राहू शकतो;परंतु मेंदू, यकृत, हृदय असे काही अवयव आहेत जे काम करेना झाले तर देहाच्या अस्तित्वाचा प्रश्न उभा राहतो.
कंपनीतली दहा ते पंधरा टक्के माणसं ही अशीच महत्वाची असतात आणि ती अचानक कंपनी सोडून गेली तर त्याचं काम दुसरा कोणी तातडीने करू शकतो असा व्यक्ती शोधणे गरजेचे असतं.
अशा या व्यक्ती हुडकून काढून कंपनीत त्या रुजू होईपर्यंतचा घटनाक्रम पूर्ण करून देणे म्हणजे हेड हंटिंग.
हा उद्योग भारतात विकास अवस्थेत असला तरी युरोपिय देशात तो उत्तम बाळस धरून आहे.कंपन्यांच्या मानव संसाधन खात्यांना जमू न शकणारी काम ही हेड हंटर्स वेळोवेळी करून दाखवतात.
गिरीशजींसारखा म्हणायला सामान्य आजारी मुलगा एक यशस्वी हेड हंटर कसा झाला याची सुरेल कहाणी या पुस्तकात आपल्याला वाचायला मिळते.
हे कादंबरी किंवा मनोगत नाही.हा आहे फक्त गिरीशजींचा प्रवास. त्यांच्या शब्दात. सुमेधजींनी आपल्या शैलीमध्ये त्याला खूप यशस्वीरित्या मांडले आहे.
शॉर्टकट हा शब्दकोशातच ठेवायचा नाही हे निश्चितच आपल्याला हे पुस्तक वाचताना कळते.
सविस्तर परिचय
पुस्तकाची सुरुवात गिरीशजींच्या वैयक्तिक आयुष्यापासून होते. जिथे त्यांना हेड हंटिंग काय हे माहितीच नसते. संधी येईल तसे शिक्षण घेत आपलं काम पूर्ण करत जाणारे गिरीशजी हळूहळू एक यशस्वी व्यक्तीं कसे बनतात याची खूप खिळून ठेवणारी अशी ही कहाणी आहे.
सुरुवातीला बोरिंघर नावाच्या औषध बनविणाऱ्या कंपनीमध्ये त्यांचा प्रवास सुरू होतो. कितीही,कोणीही आपल्याला दडपण आणलं तरी त्या दडपणाला न जुगारता आपण योग्य असू तर आपल्यासाठी जे स्टॅन्ड घेणे म्हणतात तशी बाजू धरत आपले काम करून घेणे किती महत्त्वाचं असतं हे पहिल्याच धड्यात आपल्याला गिरीश ची समजावतात. बोरिंघर एम्प्लॉईज युनियन या मान्यताप्राप्त संघटनेच्या अध्यक्षाची खोड ते कशी मोडतात हे अतिशय शिकण्यासारखे आणि मजेदार आहे.तसेच क्लोरामफेनीकॉल सारखे आत्ताच्या जगामध्ये मागासलेल्या अँटिबायोटिक किंवा औषधाचे किती महत्त्व होतंय हे कळल.
सगळ आलबेल 9 to 5 टाइप चालु असताना उदय वैद्य या आपल्या मित्राच्या रिझुमे कंपनीमध्ये रुजू होण्याचा प्रस्ताव येतो. ह्या नवीन हेड हंटिंग व्यवसायाचे शिक्षण घेत गिरीश जी चा प्रवास सुरू होतो.चांगले वाईट अनुभव येतात. शेवटच्या मिनिटाला विश्वासघात होतात.अति विश्वासाची माणसं दुरावली जातात. काही दुरावलेली माणसे जवळ येतात. हा सगळा अनुभव अतिशय वाचनीय आहे.
पूर्ण प्रवासात आयुष्याची अनिश्चितता अनेक वेळा गिरक्या घेत राहते .तसेच अगदी हातात तोंडातून आलेला घास हिरावून जाणे याला काय म्हणतात आणि जेव्हा लाखो रुपयांची डील आपल्या डोळ्यासमोर असते आणि ती अचानक फिरवून घेतले जाते तेव्हा काय मनस्थिती होत असेल, किती उदासीनता येत असेल, ती मरगळ झटकून पुढच्या मिनिटाला नवीन जबाबदारीसाठी तयार होणं;काय मानसिक तयारी लागत असेल याचा मी फक्त आणि फक्त विचार करू शकते.जेव्हा त्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले तेव्हा माझ्या मनात एक चीर कळ आली आणि आपण मनात मांडलेले मनोरे कसे खळकन कोसळतात याची जाणीव झाली.
हेच आजच्या काळात झालं असतं तर एखाद्याने आत्महत्या केली असती. पण आयुष्याने दिलेल्या/ वारंवार येणाऱ्या अपयशांना सहजतेने फसवत गिरीशजी पुढे वाटचाल करत राहतात आणि आलेली प्रत्येक संधीला नव्या जोशाने आणि दमाने ते सामना करतात.
अनेक दिवस/ महिने,वेळोवेळी मीटिंग सांभाळत काम करायच आणि अगदी शेवटच्या मिनिटाला देखील हात दिला गेला त्यातनं देखील योग्य तो मार्ग काढायचा हे स्किल आहे हेड हंटर चे.
अगदी बनिया मनस्थितीच्या लोकांना देखील त्यांनी सौम्य शब्दांमध्ये सांभाळून स्वतःचा तोल ढळू न देता उत्तर द्यावे लागते. अनेक कंपन्यांमध्ये कित्येक वर्ष काम मिळवण्यासाठी ज्यांच्याकडे ते गेले होते त्यांचे संपर्क अचानकच तुटले पण देवाच्या नशिबात काय होते ते संपर्क पुन्हा जोडले गेले.अशा या हेड हंटरच्या छोट्या श्या एका रेसुमे कंपनीचा जो मोठा विस्तार झाला तो खरच खूप वाचण्याचा सारखा आहे.विविध मोठ्या मोठ्या कंपन्यांमध्ये तुम्ही तुमच्या हजर जबाब पणाने आणि शांत अगदी डोक्यावरती बर्फ ठेवून बोलण्याच्या शैलीमुळे जी मन जिंकली, दूर गेलेले मने पुन्हा जवळ आणले.
मनावर,मेंदूवर आणि वाचेवर कसा ताबा ठेवला याचे मला खरंच आश्चर्य वाटतं.मोजून मापून शब्द बोलून मोठ्या मोठ्या अधिकाऱ्यांना आपल्या चुका जाणीव करून देणे ही हातोटी खरच शिकण्यासारखी आहे.
दिव्याखाली दुर्लक्ष पण होते कधी कधी. त्यांचा एक वर्षानुवर्ष काम करणारा कामगार त्यांना काहीही कल्पना न देता स्वतःचीच तशाच पद्धतीची एजन्सी जेव्हा काढतो तेव्हा गिरीशजी आणि उदयजी मनापासून दुःखी होतात.केसाने गळा कापणे हे अतिशय तीव्रतेने जाणवते.पण म्हणून आपण कोणाला चांगलं शिकवायचेच नाही असं न करता आपण आपलं चांगलं कार्य करत रहा. नेकी कर दर्या मे डाल चालू आहे. एक मेंटर म्हणून आपण जेव्हा कोणाला घडवत असतो आणि आपल्याला असा अंधारात ठेवून ते असे कार्य करतात तेव्हा मनाला एक चटका जरूर लागतो. नंतर जगात आपला गौरव करून आणि कुणाकडून ट्रेनिंग घेऊन त्यांनी ते सगळं केला आहे ह्याची ग्वाही देतात.पण ट्रान्सपरन्सी ची अपेक्षा आपल्या मनात असते. मला वाचताना तसे वाटले.
या सगळ्या प्रवासामध्ये गिरीशजी डॉक्टर श्रीखंडे ह्यांचा आवर्जून उल्लेख करतात. त्यांचे आयुष्यभराचे उपकार आहेत हे गिरीशजी कधीच विसरत नाही. डॉक्टर श्रीखंडे यांनी सांगितल्याप्रमाणे सूर्यनमस्कार करणे,दिवसागणिक तनामनाची काळजी कासवाच्या गतीने वाढत नेली तर शरीर सुदृढ राहते हा नियम अधोरेखित होतो.
साधा एनिमा दिल्या वरती पण तब्येत किती सुधारू शकते हा मूळ वैद्यकीय क्षेत्राचा नियम इथे अधोरेखित होते.मनात आले आज च्या काळात असाच पेशंटच्या दारात आला असता तर
सिटीस्कॅन,सोनोग्राफी इत्यादी अनेक तपासण्यांच्या जाळ्यामध्ये कळत नकळत डॉक्टर आणि पेशंट अडकले असते. विश्वास आणि आदर गिरीशजींनी डॉक्टर श्रीखंडे यांच्यावर दाखवला तो फार महत्त्वाचा आहे. फक्त हातांनी चेक करून आठवडाभरात असलेले क्रोनिक कॉन्स्टिपेशन स्वच्छ करणे हे फार अवघड आहे. डॉक्टर श्रीखंडे यांना माझा मनापासून नमस्कार. माझा वैयक्तिक वैद्यकीय शास्त्रावरचा विश्वास अधिक घट्ट होत जातो जो कमी investigations आणि अधिक क्लिनिकल judgment वर विश्वास ठेवतो.डॉक्टर श्रीखंड यांची अनपेक्षित भेट होते तेव्हा गिरीशजींचा नम्रपणा त्यांना भेटतात. डॉक्टर पण त्यांना निदानासकट ओळखतात. हे पाहून किती छान असतं ना डॉक्टर पेशंटचं नातं हे वाटतं.
आपल्या बालमित्रांना देखील गिरीशजी विसरत नाहीत.त्यांच्यासोबत केलेल्या धमाल, सामाजिक कार्य ते नक्कीच वेळोवेळी आपल्याला सांगतात.तसेच इंग्रजी भाषेवर प्रभुत्व मिळवण्यासाठी त्यांच्या मैत्रिणीने केलेली मदत व विविध पुस्तके वाचून मिळवलेले प्रभुत्व हे खूप स्फुरण देणारे ठरते.
डोक्यावरती बर्फ ठेवून बोलण्याच्या त्यांच्या कलेला मी मनापासून सलाम करते आणि त्यांच्यापासून खरंच काहीतरी मनापासून शिकण्याचा प्रयत्न म्हणजे ती कला.
चंद्रशेखर टिळकांसारख्या अवलिया मोठ्या भावाच्या सावलीतून बाहेर पडून स्वतःसाठी एक वेगळी वाट तयार करणे हा सोपा विषय नसतो. एक सिबलींग सुपेरीटी मुळे येणारा एक कॉम्प्लेक्स आपण खूप सहजतेने मोडून काढला.तसेच अनेक पारिवारिक जबाबदाऱ्या घेत स्वतःला सांभाळणे हे देखील सोपे नाही.
या प्रवासामध्ये गिरीशजींची धर्मपत्नी स्वातीजींचा देखील महत्त्वाचा रोल आहे. स्वाती गिरीश टिळकांनी जर गिरीश टिळकासारख्या माणसास घराची बाजू सांभाळत साथ दिली नसती तर हा प्रवास इतका यशस्वी ठरला नसता.
आपल्या घरच्यांच्या आजारपण बदल,होणारी ओढाताण ते मोकळ बोलतात. आपण प्रत्येक जण फेऱ्यातून कधी ना कधी गेलोच आहोत.
पुस्तकाच्या शेवटी ते त्यांचे वडील आणि त्यांच्यातील एका संवाद किंवा विसंवादाबद्दल सांगतात. हा संवाद किंवा विसंवाद प्रत्येक वडील आणि मुलांमध्ये किंवा मुलींमध्ये होण अतिशय गरजेचे आहे. पहिल्या पिढीला आपल्या नंतर आलेली पिढी नेहमीच काम चुकार, जबाबदारी न घेणारी वाटते.पण जेव्हा त्यांना पुढील पिढीचा संघर्ष कळतो तेव्हा नक्कीच अभिमान वाटतो. कधी कधी घरच्यांशी मनमोकळ बोलणं हेच महत्त्वाचं असतं हे हा संवाद अधोरेखित करतो.
उणीव
काही अनुभव यामध्ये खूप रिपीटेशन वाटतात.जसे की स्पर्धा कंपनीतनं उमेदवार आणताना जी प्रोसेस झाली ,मल्टिपल इंटरव्ह्यू. बाकी लेखन शैली मोघम आहे.
आपल्या पारिवारिक आयुष्याबद्दल आपण अगदी थोडक्यात लिहिले .आपल्या पत्नीला आपण वेळोवेळी श्रेय दिले. अजून श्रेय दिले असते तर अधिक आवडले असते.असे मला वैयक्तिक वाटतं.
समारोप
हे पुस्तक आयुष्याच्या अनेक टप्प्यावर अडकलेल्यांना मार्गदर्शक ठरू शकते. निराशेच्या गर्तेत गेलेल्यांना निराशेचे पण सोनेरी संधीत रूपांतर करता येते हे शिकवणारे असे हे पुस्तक आहे.व्यवसायिक आयुष्यात अनेक चढउतार येतात. पण आपण त्याला कसं न घाबरून जाता तोंड दिले पाहिजे याची जाणीव हे पुस्तक करून देते. असे हे मला मनापासून आवडलेले पुस्तक प्रत्येक त्या व्यक्तीने वाचावे जो कुठल्याही व्यवसायात असो किंवा व्यवसायाच्या खाच खळग्यात अडकलेला आहे. मोटिवेशन देणारे असे हे पुस्तक आहे.जरूर वाचा. परिचय कसा वाटला ते जरूर कळवा. धन्यवाद.
Comments
Post a Comment